Solvency Certificate?सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र कसे काढावे.

 नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहो कि solvency certificate म्हणजेच ऐपत दाखला कश्या प्रकारे काढल्या जाते आणि या साठी आपल्याला कोण-कोणत्या कागद-पत्रांची आवश्यकता असते.आणि हे दाखला कुठे काढून मिळत असतो आणि आपण स्वतः घरीबसल्या हा दाखला कश्याप्रकारे बनवू शकतो.Solvency Certificate.

सॉल्व्हन्सी प्रमाणपत्राला मराठी मध्ये काय म्हणतात ?Solvency Certificate Meaning?

सॉल्व्हन्सी प्रमाणपत्राला मराठी मध्ये ऐपत दाखला असे म्हणतात.आणि याचा अर्थ मराठी मध्ये ऐपत असा होतो.

सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र solvency certificate कोणत्या विभागामार्फत बनविल्या जातो?Concerned Authority

मित्रांनो सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र solvency certificate हे महसूल विभागाची (Revenue Department) सेवा आहे आणि सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र(Solvancy Certificate) आपल्याला महसूल विभागाच्या अधिकाऱ्या मार्फत दिल्या जातो.आणि मित्रहो सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रच्या Solvancy Certificate रक्कमे नुसार अधिकारी त्याच्या वर सही मारत असतात.कोणत्या अधिकाऱ्याला किती लाखाची सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र द्यायचे अधिकार आहे ते खलील प्रमाणे पहा-

रक्कम अधिकारी प्रथम अधिकारीद्वितीय अधिकारी
2 लाख रु. पर्यंत . नायब तहसीलदार (Nayb Tahsildar)तहसीलदार

उपविभागीय अधिकारी

 रु. 2,00,001 ते 8 लाखतहसीलदार (Tahasildar)उपविभागीय अधिकारीअतिरिक्त जिल्हाधिकारी
रु. 8,00,001 ते 40 लाखउपविभागीय अधिकारी (SDO)अतिरिक्त जिल्हाधिकारीकलेक्टर
40 लाखांच्या वरकलेक्टर (Collector)अतिरिक्त आयुक्तविभागीय आयुक्त
या नुसार तुम्हाला अधिकारी सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र हे देत असतात.

प्रमाणपत्राचा उद्देश Purpose of the Solvency Certificate 
 

कॉर्पोरेशन किंवा व्यक्तीच्या वतीने सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र विविध उद्देशांसाठी काम करते, त्यापैकी काही खाली दिले आहेत.

  • आपल्याला जर कोणत्या हि व्यक्तीची जमानत घ्यायची असली तर या सॉल्व्हन्सी प्रमाणपत्राचि आवश्यकता असते.
  • कृषी उत्पन्न बाजार समितीचे इलेक्शन असल्याच्या वेळी हि आपल्याला सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र याची आवश्यकता असते.
  • कंपनीची आर्थिक स्थैर्य तिच्या सॉल्व्हेंसीवर आधारित आहे. म्हणून, एखाद्या फर्मला तिच्या आर्थिक स्थितीचा पुरावा म्हणून बोली विरुद्ध ऑफर करताना सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • विविध सरकारी आणि निमशासकीय संस्थांना जामीन कागदपत्र म्हणून सॉल्व्हन्सी प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
  • कॉन्ट्रॅक्ट्स, टेंडर्ससाठी अर्ज विचारात घेताना सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट हा एक आवश्यक कागदपत्र आहे.
  • लिलावात भाग घेताना सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • परदेशात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. परदेशातील विद्यापीठांना आर्थिक पुरावा म्हणून हा दस्तऐवज आवश्यक असतो. शिवाय, देशातील शासकीय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतानाही हे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • जामीन मिळवण्यासारख्या न्यायालयीन प्रकरणांमध्येही त्याची आवश्यकता असते.
  • एखाद्या न्यायालयीन कार्यालयाची आपल्यावर केस असली तर या प्रमाणपत्राची आपल्याला जमानत साठी आवश्यकता असते.

ऑनलाईन सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र कसे बनवावे ? How To Apply Online Solvency Certificate?


सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र बनविण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला-
  • या वेबसाईटला भेट द्यावी लागेल -https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
  • या वेबसाईटवर गेल्या नंतर तुमच्या समोर खलील प्रमाणे पेज दिसेल 

  • या पेज वर आल्या नंतर तुम्हाला या आपले सरकार पोर्टल मध्ये आपले खाते तयार करून घ्यायचे आहे.
  • आणि खाते तयार झाल्या नंतर यात तुम्हाला लोगिन करायचे आहे.
  • लोगिन केल्या नंतर तुमच्या समोर खालील प्रामाणे पेज दिसेल.

  • या पेज वर आल्या नंतर तुम्ही आता आपले सरकार पोर्टल वरील सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.
  • आता एका कोपर्यात आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसत असेल त्यात आपल्याला Revenue Department ऑप्शन पहायचे आहे.
  • आणि त्यावर क्लिक करून Revenue Services या ऑप्शन वर क्लिक करून Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.
  • त्यात आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसणार.
  • सर्वात खाली आपल्याला solvency certificate नावाचा ऑप्शन दिसणार आपल्याला त्यावर क्लिक करायचे आहे.
  • आणि वर proceed बटन दाबायचे आहे.
  • आता आपल्या समोर खालील प्रमाणे पेज दिसणार 
  • त्या पेज वर आपल्याला सर्विस लिस्ट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे आणि आपल्या समोर खालील प्रमाणे पेज येणार 


  • आणि या पेज वर आपल्याला solvancy certificate असा पर्याय दिसणार त्याच्या वर क्लिक करून आपल्या समोर या नुसार पेज येईल त्यात आपल्याला संपूर्ण कागद पत्र जे solvancy certificate साठी लागतात ते दिसणार 

  • हेच कागद पत्र आपल्याला या solvancy certificate मध्ये अपलोड करायचे आहे.
  • आपल्या समोर या नुसार फोर्म येणार त्यात आपल्याला आपली संपूर्ण माहिती भरायची आहे.

  • संपूर्ण माहिती भरल्या नंतर आपल्याला कागद पत्र अपलोड करायचे आहे.
  • आणि आखरी स्टेप मध्ये ३३.६० पैश्याची रक्कम भरून अर्ज submit करायचा आहे.

सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र डाउनलोड कशी करावी?  Solvency Certificate Download

  • सर्वात पहिले आपण ज्या आपले सरकार पोर्टल वरून सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रा साठी ऑनलाईन केले होते त्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे.
  • म्हणजेच या वेबसाईट वर क्लिक करून https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
  • जर तुमची सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र तयार झाले असेल तर तुम्हाला होमपेज वर डाउनलोड ऑप्शन दाखवणार.
  • डाउनलोड ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर तुमचे सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र डाउनलोड होणार.
प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी solvency certificate validity period in maharashtra

अर्ज केल्याच्या तारखेपासून 21 दिवसांच्या आत समाधानी झाल्यावर संबंधित अधिकारी प्रक्रिया करून प्रमाणपत्र जारी करते. इतर प्रकरणांमध्ये, प्रमाणपत्र नाकारले जाईल. नाकारण्याची कारणे नमूद केली जातील आणि अर्जदाराला कळवली जातील.

सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रा साठी लागणारी कागदपत्र   Documents required for Solvency Certificate

  1. ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड , मतदार ओळखपत्र, पासपोर्ट)
  2. राहण्याचा पुरावा (रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल)
  3. नोटरीकृत प्रतिज्ञापत्र किंवा स्व-घोषणा
  4. 7/12 ची प्रत, कर पावती (ज्या मालमत्तेवर अनुदान सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र लागू केले आहे त्याचा तपशील.)
  5. शासन मान्यताप्राप्त मूल्यनिर्मात्याकडून मूल्यांकन अहवाल
  6. सोसायटी ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
  7. सोसायटी शेअर सर्टिफिकेटची प्रत
  8. नोंदणीकृत विक्री कराराची प्रत
  9. मागील तीन वर्षांच्या आयकर विवरणपत्रांच्या प्रती.

ऑफलाईन सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र कसे काढावे ?Solvency Certificate apply Offlaine?

मित्रहो ऑफलाईन (solvency certificate revenue department) सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र  आपण आपल्या गावातील महा ई- सेवाकेंद्रा मार्फत बनवू शकतो किंवा सेतू सुविधा केंद्रा मार्फत हि बनवू शकतो.

ऑफलाईन सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र करिता लागणारी कागद-पत्र Document for Offline Solvency Certificate?

  1. Poperty Valuation(मुल्यांकन परिपत्रक - हे आपल्या गावातील Sub Ragistrar Office मधून मिळतअसतो)
  2. Adhar Card (आधार कार्ड)
  3. 100 Rs. Stamp Paper Affidavit (१०० रुपयच्या स्टंप वर प्रतिज्ञापत्र 
  4. P.R Card  / 7/12 / 8-अ 
मित्रांनो या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सॉल्व्हन्सी प्रमाणपत्रा बद्दल संपूर्ण माहिती सागितली आहे जर तुम्हाला माहिती चांगली लागली असेल तर नक्की आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा.

आमच्या टेलिग्राम व व्हाटसप ग्रुप मध्ये जॉईन होण्या करिता खालील लिंक वर क्लिक करा -








आणखी काही पोस्ट - 






Post a Comment

0 Comments