नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो की आपण शासनानुसार कोणत्याही आपल्या कागदपत्रांवरच्या नावात किंवा जन्मतारखेत किंवा धर्मात दुरुस्ती कशी करू शकतो.मित्रांनो या सर्वात दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला राजपत्र Gazzate बनविणे खूप आवश्यक असते.राजपत्र Gazzate हे मंत्रालयातून बनवून येत असते.आणि ज्याही Document वर आपले नाव चुकीचे आहे त्याला याची प्रत लावून कुठेही देऊ शकतो.मित्रहो राजपत्र Gazzate हे अशी एक एकमेव प्रमाणपत्र आहे ज्याला संपूर्ण भारतात कुठेही तोड नाही. राजपत्र Gazzate याला कोणत्याही विभागात Accept केल्या जाते.
राजपत्र याच्यावर आपले जुने नाव व नवीन नाव आणि पत्ता छापून येते.राजपत्र आपण दोन भाषेत बनवू शकतो १)English २) Marathi हे दोनच भाषेत राजपत्र बनविल्या जाते.जर आपल्या Borad Certificate किंवा Marksheet व इतर कागदपत्रांवर नाव दुरुस्ती Speling Mistek असेल तर राजपत्र Gazzate मार्फत आपण ती चूक सुधारू शकतो.
मित्रहो या पोस्ट मध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत राजपत्रा विषयी माहिती सांगत आहो.जी तुमच्या लवकरात लवकर लक्षात येणार.
तसे तर आपल्याला कधी नावात, जन्मतारखेत किंवा धर्मात बदल करायचे आहे तर आपण पेपर मध्ये जाहिरात देऊन सुद्धा करू शकतो पण माझ्या हिशोबाने राजपत्र Gazzate बेस्ट राहणार.
*राजपत्र कसे बनवावे?
१) आपण स्वतः देखील राजपत्र बनवू शकतो आपले सरकार या वेबसइटवरून.
२) जर कधी तुम्हाला येत नसेल तर आपल्या जवळील सेतू सुविधा केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही राजपत्र Gazzate तयार करू शकता.
३) आपल्या जवळील एखाद्या CSC Centre किंवा Online Centre वर सुद्धा तुम्ही राजपत्र काढू शकता.
४) यासाठी तुम्हाला सेतुत जाऊन राजपत्रा साठी कशी काय Process आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता.
५) राजपत्र मिळण्याचा कालावधी हे ८ ते १५ दिवसाचा राहत असतो.
६) राजपत्र Gazzate याची लिस्ट दर शुक्रवारी लागत असते.
७) राजपत्र आपल्याला शुक्रवारी मिळतो.
८) राजपत्र आपल्या प्रत्येक नावातील problem ला दूर करतो.
* याला लागणारे कागदपत्र -
१) ज्या कागदावर नाव चुकीचे आहे त्याची झेरॉक्स
२) ज्या काही कागदावर नाव बरोबर आहे त्याची एक झेरॉक्स
३) आधार कार्ड झेरॉक्स
४) १ पासपोर्ट फोटो
५) १००/- रू. स्टॅम्प वर प्रतिज्ञापत्र ( तहसीलदार साहेबाचा सही शिक्का असलेले.)
६) आणि एक राजपत्र याचा स्वघोष्णा पत्र.जे की पोर्टल मधून निघत असते.
👉आता आपण पाहणार आहो राजपत्र Gazzate कसे बनवावे -
१) राजपत्र बनविण्यासाठी आपल्याला https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
२) या वेबसाईट वर गेल्या नंतर आपल्याला सर्वात अगोदर आपले खाते तयार करा लागेल.
३) खाते तयार झाल्या नंतर आपल्याला यात लोगिन करावे लागेल.
४) लोगिन झाल्या नंतर आपल्या समोर या वेबसाईटचा मुख्यपृष्ठ येणार.
५) या ठिकानी आपल्याला राजपत्र असे टाईप करावे लागेल.
६) आणि आपल्या समोर राजपत्राचा फोर्म येणार.
७) तो फोर्म व्यवस्थित भरून घेणे.
अश्याप्रकारे तुम्ही राजपत्र अप्लाय करू शकता.
...धन्यवाद...
आणखी अश्या प्रकारचे पोस्ट वाचण्याकरिता खलील लिंक वर क्लिक करा.
https://raheemguru.blogspot.com/
%20%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%20%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87.jpg)
0 Comments
हि वेबसाईट तुम्हाला नवीन नवीन सरकारी योजना,टेच संबंधी माहिती,सरकारी नोकरीचे जागा,व इतर माहीती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.