Ration Card नवीन राशन कार्ड कसे बनवावे?

 मित्रांनो आपण भारताचे नागरिक आहो आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या सरकारने नवीन शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड वाटप केलेले आहे.आणि आपल्याला चांगल्या प्रकारे अन्न पुरवठा हि वाटप केल्या जाते.भारतच हा असा एक असा एकमेव देश आहे जेथे सर्वाना समान अन्नपुरवठा मिळत असतो.आपल्याला राज्य सरकारने दिलेले हे एक ओळखपत्र आहे.ज्याचा वापर करून आपण अन्नधान्य घेत असतो.

नवीन राशन कार्ड/Ration Card 

मित्रांनो या नवीन राशन कार्ड चे हि प्रकार आहे.आणि सरकारने या शिधापत्रिकेचे वाटप लोकांचे उत्पन्न पाहून दिलेले आहे.आपण कधी विचार केला तर प्रत्येक व्यक्ती जवळ तुम्हाला वेग वेगळ्या प्रकारचे राशन कार्ड पाहायला मिळणार.उदा.पिवळे राशन कार्ड,केशरी राशन कार्ड,पांढरे राशन कार्ड,इत्यादी प्रकार तुम्हाला राशन कार्डचे पाहायला मिळतात.यात जे लोक नोकरीवर असतात त्यांना सरकार पांढरे कार्ड देत असते आणि जे दारीन्द्र्या रेषेखालील असतात त्यांना अंतोद्य म्हणजेच पिवळे कार्ड देत असते.आणि जे केशरी कार्ड असतात त्यांना त्याच्यावर ५ रु किलोने धान्य देत असते.
मित्रांनो आता पर्यंत आपण वरील प्रमाणे थोडीफार राशन कार्ड बद्दल माहिती पाहिलेली आहे आता आपण राशन कार्ड बद्दल महत्व्वाचे मुद्दे पाहू.

आपण आता कार्डाचे प्रकार पाहू. Types Of Ration Card

१) केशरी ( Orange Ration Card)

२) पिवळे (अन्तोदय)(Yellow Ration Card)

३) पांढरे (White Ration Card)

  • केशरी Orange Ration Card - केशरी कार्ड या लोकांना भेटत असते ज्यांची परिस्थिती हि हलकीचे नसते.त्यांच्या जवळ शेती व इतर त्यांचे कामकाज सर्व बरोबर असते.आणि हे लोक दारींद्र्या रेषेखालील नसतात.अश्या लोकांना राज्यसरकार केशरी कार्ड देत असते.आणि या लोकांना अन्न धान्य प्रती ५ रुपय किलो न भेटत असते.

  • पिवळे Yellow Ration Card - या प्रकारात दारीन्द्र्या रेषेखालील लोकांचा समावेश होत असतो त्यांना हे कार्ड मिळत असते.या लाकांचे राहणीमान अति हलकीचे असते व हे लोक दारीन्द्र्य रेषेखालील येतात म्हणून राज्यसरकार यांना पिवळे कार्ड म्हणजेच अन्तोदय योजनेचे कार्ड देते.या लोकांना अन्न धान्य प्रती २ रुपय किलो न भेटत असते.
  • पांढरे कार्ड  White Ration Card - या प्रकारात जे लोक शासकीय नोकऱ्या करतात व इतर नोकऱ्या करतात त्यांचा समावेश यात होत असतो आणि त्यांचा उत्पन्न हि खूप राहत असतो.म्हणून या लोकांना पांढरे कार्ड वितरीत केल्या जातात.


आता आपण पाहू आपल्याला राशन कार्ड "New Ration Card" मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते.

१) शिधापत्रिका मिळविण्यासाठी आपण भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

२) राज्य सरकार आपल्याला आपल्या पात्रतेनुसार कार्ड वितरीत करीत असते.

३) राशन कार्ड बनवियासाठी आपले वय कमीत कमीत १८ वर्षे पूर्ण असणे खूप आवश्यक असते.

४) आपले राशन कार्ड इतर कोणत्याही ठिकाणी बनलेले नसावे.

५) राशन कार्ड बनविण्यासाठी ज्या अटी व शर्ती असतात ते पूर्ण असणे खूप आवश्यक असते.

    राशन कार्ड बनविण्यासाठी या सर्व नियमांचा काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते तेव्हाच आपण राशन कार्ड काढू शकतो.


राशन कार्ड साठी कागदपत्रे कोणकोणते लागतात. New Ration Card Document

१) नवीन राशन कार्ड बनविण्यासाठीचा अर्ज 

२) रहिवाशी दाखला 

३) कुटुंबप्रमुखाचे २ फोटो 

४) कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स 

५) कुटुंब प्रमुख यांच्या नावाची घर टॅक्स पावती

६) कुटुंब प्रमुख यांच्या नावाचे वीज बिल 

७) बँयाकेच्या  खाते पुस्तकाची झेरोक्स 

८) निवडणूक ओळखपत्राची झेरॉक्स 

9) गॅस पुस्तकाची झेरॉक्स

१०) ज्या दुकानदारां जवळून आपण अन्नधान्य घेतो त्या दुकानदाराचा दाखला 

११) उत्पन्नाचा दाखला 

१२) शेती असल्यास सात -बारा / ७/१२ 

१३) शेती नसल्यास भूमिहीन दाखला

इत्यादी कागदपत्र नवीन राशन कार्ड तयार करायसाठी लागत असतात.






राशन कार्डच्या इतर माहिती घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.






मित्रांनो माहिती चांगली लागल्यास आपल्या मित्रांन पर्यंत नक्की शेअर करा.

....धन्यवाद....


Post a Comment

0 Comments