नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो कि आपण आपल्या दुकानाचे लायसन कसे काढू शकतो व त्या साठी कोण-कोणते कागद पत्र लागतात. What documents are required to start a shop?
असणे खूप आवश्यक आहे.हेच आपण आजच्या या पोस्ट मध्ये पाहणार आहो.
एखाद्या वेळेस काय होते आपण एक छोटी-मोठी दुकान टाकतो एखादा अनोळखी व्यक्ती आपल्याला आपल्या दुकानाच्या लायसन बद्दल विचारतो अश्या वेळेस आपन मोठ्या संकटात पडत असतो म्हणून दुकानाचे लायसन असणे खूप आवश्यक असते.
👉चला तर पाहू या दुकानाचे लायसन कसे काढल्या जाते त्या बद्दल महत्वाच्या सूचना -
१) सर्वात पहिले तर मित्रांनो आपल्या जवळ एक दुकान असणे आवश्यक आहे आणि ते व्यवसाय आपण एक-किंवा दोन महिन्या अगोदर चालू केलेले असावे.
२) आपण जे Shop दुकान चालू केलेली आहे त्याचे Banner आपल्या जवळ असणे आवश्यक आहे.
३) आणि त्यावर जे आपण आपल्या व्यवसायाचे नाव ठेवणार आहो ते लिहिलेले असणे आवश्यक आहे.
४) आपण जे Shop चालू केली त्या शॉप मध्ये किती लोक काम करतात त्यांची हि गिनती आसने आवश्यक आहे.
५) मित्रांनो आपण जे दुकानाचे लायसन काढत आहो त्या लायसन ला आपण इंग्लिश मध्ये Shop Act लायसन असे म्हटल्या जाते.
६) मित्रांनो आपण जे Shop Act Licence काढत आहो आपल्याला फक्त त्याचे पोचपावती (Intimation Slip) च ऑनलाईन मिळत असते.
७) हीच पोचवती आपले लायसन म्हणून ओळखल्या जाते.
८) हि पोचपावती (Intimation Slip) म्हणजे आपल्या दुकानाचे लायसन Permanant म्हणजे हमेशा साठी असते याला Renew करण्याची आवश्यकता नसते.
👉आता आपण पाहणार आहो याला लागणारे कागद-पत्र -
१) आपल्या दुकानाचे फोटो
२) १ पासपोर्ट फोटो
३) आधार कार्ड झेरॉक्स
४) दुकानात काम करणाऱ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स
५) स्वघोष्णा पत्र
६) व्यवसाय कधी सुरु केला त्याची तारीख
७) सही
८) दुकानाचे नाव जे आपण ठेवलेले आहे.
मित्रहो मी तुम्हाला संपूर्ण जे काही माहिती लायसन काढाय साठी लागते ते पूर्ण सांगितलेली आहे.
👉चला तर पाहूया Shop Act Licence कश्या प्रकारे काढल्या जाते.
मित्रहो Shop Act Licence दोन प्रकारे काढल्या जातात एक तर आपण स्वतःहि काढू शकतो किंवा एखाद्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन पण काढू शकतो.मी तुम्हाला दोन्ही पद्धत Shop Act Licence काढायची सांगणार आहो.
* स्वतः कश्या प्रकारे काढल्या जाते - सर्वात पहिले तर तुम्हाला Shop Act Licence काढण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
जसेच तुम्ही या लिंक वर क्लिक कराल तुमच्या समोर या वेबसाईट चे होम पेज उघडून येणार.तुम्हाला तुमचे खाते तयार करा लागणार.तुम्ही दोन प्रकारे खाते तयार करू शकता १) आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्या माध्यमातून किंवा आपले कागद- पत्र अपलोड करून.



0 Comments
हि वेबसाईट तुम्हाला नवीन नवीन सरकारी योजना,टेच संबंधी माहिती,सरकारी नोकरीचे जागा,व इतर माहीती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.