राशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट (Ration Card Name Addition) कसे करावे.त्यासाठी कागदपत्र कोणकोणते कागदपत्र लागतात?

राशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट (Ration Card Name Addition) कसे करावे.त्यासाठी कागदपत्र कोणकोणते कागदपत्र लागतात?



आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहों राशन कार्ड मध्ये नाव कश्या प्रकारे टाकल्या जातात.काही वेळा असं होते कि  आपल्या कुटुंबातील लहान मुलांचे किंवा आपल्या कुटुंबात कोणाचे लग्न झाले की आपल्या सूनबाई चे नाव आपल्याला आपल्या शिधापत्रिकेत समाविष्ट करायचे असते त्या वेळेस आपल्याला हे समजत नाही की कश्या प्रकारे नाव राशन कार्ड मध्ये टाकावे.आज काल राशन कार्ड मध्ये नाव दोन प्रकारे टाकल्या जातात एक ऑफलाईन म्हणजे हस्तलिखित दुसरे म्हणजे ऑनलाईन जेव्हा पर्यंत आपले नाव राशन कार्ड मध्ये ऑनलाइन येत नाही तेव्हा पर्यंत आपल्याला सरकार कडून धान्य भेटत नाही.

👉आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू याची प्रक्रिया -


- कारण कि मित्रांनो राशन कार्ड हे आपल्या कुटुंबाचे ओळख प्रमाणपत्र आहे ते सरकार कडून आपल्याला मिळालेले असते त्या वर आपल्या कुटुंबाला अन्न धान्य मिळत असतो.दर महिन्याच्या महिने आपल्याला याच्यावर अन्न-धान्य मिळतो.यात आपल्या पूर्ण कुटुंबाचे नाव असते आणि राशन कार्डचि आपल्याल्या शैक्षणिक कामाकरिता खूप आवश्यकता पडत असते. 
आणि आपल्या कुटुंबां मध्ये आलेल्या व्यक्तीचे यात नाव टाकणे आवश्यक आहे.जर आपण त्या व्यक्तीचे यात नाव टाकले तर आपल्या ला शिल्लक अन्न पुरवठा मिळत असतो.

👉राशन कार्डमध्ये नाव टाकण्याची प्रक्रिया कशी आहे?


तर राशन कार्डमध्ये नाव टाकण्याचे दोन प्रकार पडतात 

१) ऑफलाईन प्रमाणे कार्डात नाव टाकणे.

२) ऑनलाईन प्रमाणे कार्डात नाव टाकणे.


* ऑफलाईन पद्धत - मित्रांनो ऑफलाईन प्रमाणे म्हणजे पहिले आपल्या ला आपल्या कार्डात हस्तलिखित पद्धती नुसार नाव टाकावे लागते.नंतर आपण ते नाव ऑनलाईन करू शकतो.

* ऑनलाईन पद्धत - मित्रांनो ऑनलाईन पद्धत म्हणजे ज्या वेळेस आपण कंट्रोल डीलर जवळ जातो तेव्हा आपल्याला त्यांच्या जवळ आपल्या बोटांचे प्रमाणीकरन म्हणजेच अंगठा लावावा लागतो.या साठीच ज्या वेळेस आपण ऑफलाईन नाव टाकतो तेव्हा त्याला ऑनलाईन करणे आवश्यक राहत असते.

आता तुम्हाला मित्रांनो ऑफलाईन आणि ऑनलाईन यातील फरक समजला असेल.आता आपण पुढील प्रक्रिया पाहू.


* राशन कार्ड मध्ये नाव टाकायसाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात?


१) सर्वात पहिले तर तुम्हाला तुमच्या राशन कार्ड मध्ये जेवढे नाव आहे सर्वांच्या आधार कार्डचि झेरॉक्स लावावे लागेल.

२) समजा तुम्हाला कधी तुमच्या कुटुंबातील बाळाचे नाव टाकायचे आहे तर त्याचा जन्म दाखला व आधार कार्ड झेरोक्स लावावी लागेल.

३) कधी सुनिचा नाव टाकायचा असेल तर त्यांच्या माहेरातून म्हणजेच त्यांच्या बाबांच्या गावातील तहसील मधील नाव कमी करायचा दाखला आणावा लागेल.

४)  तुम्ही ज्या दुकानदारां जवळून धान्य घेता त्या दुकान दाराचा दाखला लागेल.

५) आणि सर्वात शेवटी तुम्हाला नाव टाकण्यासाठी एक अर्ज लागेल ( नाव समाविष्ट करायचा अर्ज)

👉आता आपण पाहू राशन कार्डमध्ये नाव कुठ टाकल्या जाणार-

* सेतू सुविधा केंद्र - मित्रांनो जर आपल्याला राशन कार्ड मध्ये नाव टाकायचे आहे तर तुम्हाला तुमच्या गावा जवळील सेतू सुविधा केंद्रा सोबत भेट घ्यावी लागेल.व तुम्हाला तो फोर्म त्यांच्या जवळ भरावा म्हणजेच जमा करावा लागेल.

कधी तुम्हाला राशनकार्ड बद्दल काही समस्या असल्यास तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयातील राशनकार्ड पुरवठा विभाग यांच्या सोबत संपर्क साधू शकता.




 👇👇👇


राशन कार्ड नाव समाविष्ट अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा.


                पोस्ट आवडल्यास मित्रांनो नक्की आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद.                                                                                                                                                                                                               



Post a Comment

0 Comments