Unique Disability ID अपंगाचे प्रमाणपत्र कसे काढावे ? UDID CARD

 नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहो कि अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने कशे काढावे.बरेचदा आपल्या घरातील किंवा आपल्या संपर्कातील आपले मित्रमंडळी अपंग असतात आणि त्यांना व आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती नसते कि अपंग प्रमाणपत्र कश्या प्रकारे बनविल्या जाते.आणि यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात व याची प्रक्रिया कशी असते आणि आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अपंग प्रमाणपत्र कश्या प्रकारे बनवू शकतो.


अपंग प्रमाणपत्र कोण बनवू शकते ? Who can produce disability certificate (UDID CARD)?

जे शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा संवेदनात्मक कमजोरी असलेले लोक आहे ते अपंग प्रमाणपत्र बनवू शकतात.जे खूप जास्त टक्केवारी ने अपंग आहे आणि ज्यांच्या जवळून काही होत नाही आणि ज्या वेळेस त्यांची तपासणी केली असता ते ४०% किंवा  ४५% टक्केच्या वर अपंग आहे ते अपंग प्रमाणपत्र बनवू शकतात.


UDID CARD म्हणजे काय ? What is UDID card?

मित्रांनो आपल्या संपूर्ण भारतात जे लोक अपंग,दिव्यांग आहे त्या सर्वाना अपंगाचा लाभ देण्याकरिता भारत सरकारने अपंग व दीव्यांग लोकांना अपंग असल्याचे प्रमाणपत्र देण्याकरिता एक योजना काढलेली आहे त्या योजनेचे नाव आहे UDID CARD म्हणजेच याचे संपूर्ण अर्थ Unique Disability ID Card असे आहे.Unique Disability ID यालाच आपण मराठीत वैश्विक दिव्यांग ओळखपत्र किंवा स्वावलंबन कार्ड असे देखील म्हणतो.UDID संपूर्ण अर्थ युनिक डीवाइस आयडनटीफायर (Unic Device Identifier) असा आहे.


UDID CARD मध्ये आपली कोण-कोणती माहिती राहते?What information about you resides in a UDID card?

या कार्डमध्ये अपंग किंवा दिव्यांग व्यक्तीची खालील प्रमाणे माहिती असते -
  • नाव 
  • जन्म तारीख 
  • लिंग
  • फोटो 
  • विकलांगतेचा प्रकार 
  • दिव्यांगतेचे कारण
  • ईतर 

अपंगत्प्रवाचे प्रकार किती असतात? How many types of disability are there?

  1. Intellectual disability बौद्धिक अपंगत्व
  2. Learning disability शिकण्याची अक्षमता
  3. Hearing impairment  श्रवणदोष
  4. Physical disability शारीरिक अपंगत्व
  5. Autism spectrum disorder ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर
  6. Developmental disability विकासात्मक अपंगत्व
  7. Multiple disabilities एकाधिक अपंगत्व
  8. Vision impairment  दृष्टीदोष
  9. Cerebral palsy सेरेब्रल पाल्सी
  10. Mental illness मानसिक आजार
  11. Deafblindness बहिरे अंधत्व
  12. Dyscalculia  डिस्कॅल्क्युलिया
  13. Attention deficit hyperactivity disorder लक्ष तूट अतिक्रियाशीलता विकार
  14. Dysgraphia डिस्ग्राफिया
  15. Multiple sclerosis पल स्क्लेरोसिस
  16. Dyslexia डिस्लेक्सिया
  17. Blindness अंधत्व 
  18. Muscular dystrophy स्नायुंचा विकृती 
  19. Traumatic brain injury अत्यंत क्लेशकारक मेंदूला दुखापत
  20. Spinal cord injury मणक्याची दुखापत
  21. Epilepsy अपस्मार
  22. Spina bifida स्पायना बिफिडा
  23. Neurological disorder न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर
  24. Nonverbal learning disorder शाब्दिक शिक्षण विकार  

अपंगाचे प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढावे ?  How to Get Disability Certificate Online(PWD FORM Online Process)

  1. सर्वात पहिले आपल्याला या वेबसाईटला भेट द्यावी लागेल https://www.swavlambancard.gov.in/
  2. या वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे होम पेज दिसेल 
3

  • या वेबसाईट वर आल्या नंतर तुम्हाला खूप सारे पर्याय दिसणार त्यात तुम्हाला सर्वात वर उजव्या कोपऱ्यात Register असा ऑप्शन दिसणार.
  • त्यात तुम्हाला Register ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
  • Register वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसणार

  • ४ स्टेप पूर्ण कराव्या लागेल.
  • सर्वात पहिली स्टेप Personal Details 
  • यात तुम्हाला तुमचे पूर्ण नाव,वडिलांचे संपूर्ण नाव व ईतर माहिती भरावी लागेल.
  • माहिती भरल्या नंतर तुम्हाला यात तुमचे फोटो व सही अपलोड करावी लागेल.
  • फोटोला तुम्हाला  jpeg, jpg and png या फोरमेट मध्ये आणि त्याची साइज 15 KB ते 100 KB च्या आत करावी लागेल.
  • आणि सही ची साइज तुम्हाला jpeg, jpg and png फोरमेट मध्ये व त्याची साईज  3 KB ते 30 KB च्या आत करावी लागेल.
  • फोटो आणि सही चि साइज तुम्ही तुमच्या Computer किंवा Laptop मधील Paint टूल मध्ये करू शकता.
  • खाली तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता टाका लागेल.
  • आणि पत्त्याचा पुरावा जोडावा लागेल.उदा.आधार कार्ड इत्यादी.

  • अशेच तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसणार.
  • Disability Details (अपंगत्वाची माहिती)
  • Employment Details (रोजगारा बद्दल माहिती)
  • Identity Details ( आपल्या ओळख बद्दल माहिती)
  • इत्यादी ऑप्शन तुम्हाला दिसणार यात तुम्हाला संपूर्ण माहिती भरावी लागेल.
  • माहिती भरल्या नंतर तुम्हाला Form चि Print काढावी लागेल.
  • आणि आपल्या जिल्ह्यातील मोठ्या विद्याकीय रुग्णालयात म्हणजेच सरकारी दवाखान्यात घेऊन जावे लागेल.
  • त्या ठिकाणी तुमचे चेकअप केल्या जाणार आणि काही दिवसांनी तुमचे प्रमाणपत्र ऑनलाईन होऊन जाणार.

UDID कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?What documents required for UDID card?

Adress Proof (पत्त्याच्या पुरावा) - 

  • Adhar Card आधार
  • Driving Licence ड्रायव्हिंग लायसन्स
  • Maharashtra State Domeciale Certificate महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र
  • etc इत्यादी.

Identity Proof (ओळखीचा पुरावा)

  • Adhar Card आधार कार्ड 
  • Pan Card पॅन कार्ड 
  • Driving Licence ड्रायव्हिंग लायसन्स
  • etc.इत्यादी

Uploding Document अपलोड करण्यासाठी कागदपत्र 

  • 1 Passport Photo (१ पासपोर्ट फोटो)
  • Signature (सही)
  • Adhar Card (आधार कार्ड)

Pwd Form For Udid (Unique Disability ID Form) Download Clik Here डाउनलोड करण्यासाठी खालील फाईलवर क्लिक करा.


How to Gate Udid Card Status अपंग प्रमाणपत्रा स्तिथी कशी चेक करावी.

  • सर्वात पहिले तुम्हाला या वेबसाईट वर यायचे आहे . https://www.swavlambancard.gov.in/
  • वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसेल.



  • आल्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी उजव्या बाजूला Track Your Application Status असा ऑप्शन दिसेल.त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • त्यात तुम्हाला खालील प्रमाणे पेज दिसणार.

  • त्या ठिकाणे तुम्हाला 18 अंकी तुमचे UDID नंबर टाकावे लागणार जे कि तुम्हाला फोर्म भारत्या वेळेस मिळालेले होते.
  • नंबर टाकल्या नंतर तुम्हाला तुमचे अर्ज कुठ पर्यंत आहे ते तुम्हाला माहित पडणार.

How To Download Disability Card (UDID CARD)अपंग प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे?

  • यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल - https://www.swavlambancard.gov.in/home/login
  • क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे पेज दिसेल 
  • या ठिकाणे तुम्हाला भेटलेले UDID Number टाकावे लागणार.
  • तुमची पूर्ण जन्मतारीख हि टाकावी लागणार.
  • आणि दिलेला क्याप्चा सुद्धा टाका लागणार.
  • हे सर्व प्रक्रिया झाल्या नंतर तुम्हाला Login बटनावर क्लिक करावे लागणार.
  • क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर तुमचे अपंग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय दिसणार.
  • तिथून तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.

महत्वाचि टिप -

जर मित्रांनो तुम्हाला वरील माहिती हि चांगली लागली असेल तर आपल्या मित्रांन पर्यंत नक्की शेअर करा व आपल्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा.असेच नव-नवीन माहिती करिता आमच्या टेलिग्राम व व्हाटसप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा.

आणि आम्ही हिंदी मध्ये आमचे युट्युब चनल सुरु केलेले आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा खूप काही शिकू शकता त्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे.
...धन्यवाद...












Post a Comment

0 Comments