जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)कसे काढावे ? व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात पूर्ण माहिती.
मित्रांनो जातीचा दाखला हा तीन अधिका-या मार्फत बनविल्या जातो.त्यातील पहिला अधिकारी म्हणजे -
१) नायब तहसीलदार (Nayab Tahsildar) :- सर्वात पहिले ज्या वेळेस आपण जातीच्या दाखल्या साठी अप्लाय करतो त्यावेळेस तो प्रकरण या अधिका-याजवळ जात असतो.या अधिका-या जवळून पडताळणी झाल्या नंतर तो तहसीलदार साहेबाजवळ जातो.
२) तहसीलदार (Tahsildar) :- मित्रांनो तहसीलदार म्हणजे आपल्या तालुक्याचे दांडाधिकारी म्हणजेच तहसीलदार.नंतर तो जातीचा दाखल्याचा प्रकरण नायबतहसीलदार जवळून तहसीलदार जवळ येतो त्यांच्या जवळून त्याची पडताळणी झाल्या नंतर तो दाखला S.D.O जवळ म्हणजेच (Sub Divisional Officer ) कडे जातो.
३) उपविभागीय अधिकारी (S.D.O) :- मित्रांनो तहसीलदार जवळून तो जातीचा दाखला पाठविल्या जातो उपविभागीय अधिकारी जवळ नंतर याच्या जवळून पडताळणी झाल्या नंतर तो दाखला तयार केल्या जातो.
अश्या प्रकारे तीन अधिका-या जवळून जातीचा दाखला तयार केल्या जातो.व जातीचा दाखला तयार होतो.
👉आता आपण पाहू जातीचा दाखला कुठे व कसा काढायचा आणि याला कागद-पत्र काय काय लागतात.
मित्रहो जातीचा दाखला तयार करण्यासाठी आपणास आपल्या गावातील किंवा तलुक्यातील सेतू सुविधा केंद्रा मध्ये जा लागते व त्या ठिकाणी आपल्यास आपले जातीचे दाखले तयार करून मिळतात.सेतू सुविधा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्र हे आपल्या आम नागरिकांसाठी सरकारने ठरवून दिलेले केंद्र होय.या ठिकाणी आपणास प्रत्येक कागद पत्राची माहिती मिळते.व तयार करून हि मिळते.
👉यासाठी कोण-कोणते कागद पत्र लागतात ?
१) स्वतःचि टी.सी किंवा बोनाफाईड
२) बाबाची टी.सी किंवा जन्म दाखला
३) आजोबाची टी.सी किंवा (आजोबा मृत्यू असल्यास मृत्यू दाखला )
४) कोतवाल बुकाची नक्कल किंवा खरेदी-खत
५) आपल्या स्वतःचे आधार कार्ड झेरोक्स
६) बाबाचे आधार कार्ड झेरोक्स
७) राशन कार्ड झेरोक्स
८) रहिवासी दाखला
एवढे सारे कागद-पत्र जातीच्या दाखल्यासाठी लागतात.
👉आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कि,हि कोतवाल बुक नक्कल काय आहे व खरेदी खत काय आहे.तर या बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.
* कोतवाल बुक नक्कल (Kootwal Book Nakkal):- मित्रांनो कोतवाल बुक म्हणजे एक महसुली पुरावा होय.याचा उपयोग जातीचा दाखला काढण्या करिता केला जातो.याचा उपयोग या कारणास्तव आपल्यास पडतो याच्या वर आपल्या आजोबा पंजोबा चि पूर्ण माहिती असते व आपल्या जातीचा उल्लेख हि यावर असते.तुम्हाला हि नक्कल तुमच्या तहसील कार्यालयाच्या नक्कल विभागामध्ये मिळते.
* खरेदी खत (Family Land Purchasing Record) :- याचा अर्थ असा होतो मित्रांनो ज्या प्रमाणे आपण कोणतेही वस्तू घेतांना आपण स्टॅम्प करतो त्याच प्रमाणे त्या काळी आपल्या आजोबांनी खरेदी विक्री केली असेल त्या पुराव्यावर त्यांची पूर्ण माहिती असेल त्या खरेदीच्या आधारावर तुम्हाला जातीचा दाखला बनविल्या जाते.
असे खूप काही महसुली पुरावे आहे ज्या मार्फत जातीचे दाखले (Caste Certificate) तयार केल्या जाते.
%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%20(1).jpg)
0 Comments
हि वेबसाईट तुम्हाला नवीन नवीन सरकारी योजना,टेच संबंधी माहिती,सरकारी नोकरीचे जागा,व इतर माहीती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.