नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Crimilayer Certificate)कसे काढावे ? व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात संपूर्ण माहिती.


मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहो नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र हे काय असते व त्या साठी कोण-कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात.तसे तर आपल्या  शैक्षणिक क्षेत्रात खूप वेग-वेगळ्या प्रकारची कागदपत्रे आपल्याला लागत असतात आणि ती कागदपत्रे कशी तयार केली जातात हे आपल्याला माहित नसते आणि कुठे बनविल्या जाते हे पण आपल्यास माहित नसते त्यातीलच एक कागद म्हणजे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र.



सर्वात पहिले तर आपण जाणून घेऊ कि हा प्रमाणपत्र कोण कोणत्या अधिका-या जवडून तयार बनते आणि याची प्रर्क्रिया काय राहत असते.हे प्रमाणपत्र बनविण्यासाठी मित्रहो आपल्याला तहसील कार्यालय मधील सेतू सुविधा केंद्रात जा लागत असते त्या ठिकाणी आपणास हे प्रमाणपत्र बनवून भेटते.

सेतू सुविधा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्र हि एक अशी जागा आहे जेथे आपल्याला लागणारी प्रत्येक कागद पत्र मिळत असतात.त्या ठिकाणी आपल्याला सर्व कागद पत्रा बद्दल खूप माहिती मिळत असते.

नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र हे फक्त ३ वर्षा साठी मर्यादित राहत असते.नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र हे आपल्या उत्पन्नावर अवलंबून राहत असते या मार्फत आपणास सरकारी फोर्म,स्कॉलरशिपचे फोर्म,इत्यादी फोर्म भरताना आपल्यास या नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र प्रमाणपत्राची आवश्यकता राहत असते.

👉आता आपण पाहूया नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र कोण कोणत्या अधिका-या जवळून आपणास मिळत असते.

१) नायब तहसीलदार :- ज्या वेळेस आपण नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र सेतूत ऑनलाईन बनविण्यासाठी टाकतो त्या वेळेस ते प्रमाणपत्र नायब तहसीलदार यांच्या जवळ जात असते.त्याच्या वर प्रक्रिया करून नायब तहसीलदार ते प्रकरण तहसीलदार यांच्या जवळ पाठवत असतो.

२) तहसीलदार :-तेच नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राचे प्रकरण त्याची पडताळनि करून तहसील दार प्रकरण उपविभागीय अधिकारी म्हणजेच (S.D.O) यांच्या जवळ पाठवत असतो.

३) उपविभागीय अधिकारी :- तहसीलदार यांच्या जवळून प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्या जवळ आल्या नंतर त्या प्रकरणाची तपासणी केल्या जाते त्याच्या वर प्रक्रिया केल्या जाते व त्या प्रकरणावर उपविभागीय अधिकारी यांच्या सह्या होतात व नंतर नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र आपल्या मिळते.

या प्रमाणे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र या तीन अधिकाऱ्या जवळून तपासणी झाल्या नंतर आपणास मिळत असते.

👉 आता आपण पाहू नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रा साठी कोण कोणते कागद पत्र लागत असतात.

१) स्वताचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच T.C (School Living Certificate) झेरॉक्स 

२) स्वताचा जातीचा दाखला म्हणजेच (Caste Certificate) झेरॉक्स 

३) ३ वर्षाचा तहसीलदार साहेब यांचा उत्पन्नाचा दाखला ( Income Certificate)

४) स्वतःच्या आधार कार्डचि झेरॉक्स 

५) बाबाच्या आधार कार्ड चि झेरॉक्स 

६)राशन कार्ड झेरॉक्स 

७) रहिवाशी दाखला

या प्रमाणे तुम्ही आपले  नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र काढू शकता.मित्रांनो कधी तुम्हाला पोस्ट चांगली व माहिती पूर्वक  वाटली असेल तर आपल्या मित्रान पर्यत पोस्ट नक्की पोहोचवा.


 



Post a Comment

0 Comments