जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) कसे काढावे ? व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात पूर्ण माहिती.(How to get Caste Validity Certificate?)


Caste Validity Certificate




👉मित्रांनो सर्वात पहिले आपण जाणून घेऊया जात वैधता प्रमाणपत्र काय आहे? व ते कशासाठी लागत असते.व कोणा-कोणाची बनत असते.


१) विद्यार्थी :- मित्रहो आपल्याला हे तर माहीतच अशेल कि ज्या वेळेस   आपण १० वी झाल्या नंतर ११ (सायन्स) ला अॅडमिशन घेतो तेव्हाच आपल्याला शाळेत सांगितले जाते कि  जात        वैधता प्रमाणपत्र म्हणजेच Caste Validity बनवून घ्या.तर जे विद्यार्थी ११ वी १२ वी सायन्स मध्ये असतात त्यांची बनत असते.

२) नोकरी :-  ज्या वेळेस आपल्याला नोकरी लागते व आपल्या कागदपत्रांची पडताळणी होते त्या वेळेस आपणास जात वैधता प्रमाणपत्र Caste Validity मांगत असतात.

३) निवडणुका :- ज्या वेळेस आपण उमेद्वारीत उभे राहत असतो तेव्हा आपल्याला जात वैधता प्रमाणपत्राची Caste Validity आवश्यकता असते.

मित्रांनो हे जे जात वैधता प्रमाणपत्र आहे हे आपल्याला आपल्या जिल्ह्यातील समाजकल्याण ऑफिस येथून मिळत असते.

👉आता आपण पाहणार आहो जात वैधता प्रमाणपत्रासाठी  कागद-पत्र काय-काय लागतात?


१) स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला (T.C) किंवा बोनाफाईड 

२) बाबाच्या शाळा सोडल्याचा दाखला (Father T.C)

३) आजोबाची टी.सी किंवा (आजोबा मृत्यू असल्यास मृत्यू दाखला )

४) कोतवाल बुकाची नक्कल किंवा खरेदी-खत

५) आपल्या स्वतःचे आधार कार्ड झेरोक्स  

६) बाबाचे आधार कार्ड झेरोक्स 

७) राशन कार्ड झेरोक्स

८) रहिवासी दाखला  

९) आपल्या कुटुंबांचि वंशावळ 

१०) १०० रु. स्टॅम्प वर नमुना १७ व नमुना १४(३) छापून त्यावर प्रतिज्ञापत्र करणे.

११) हे सर्व झाल्या नंतर अर्ज एखाद्या ऑनलाईन सेंटर ( CSC Center)वर ऑनलाईन करणे.


ऑनलाईन झाल्यावर तेथून जो आपल्याला ऑनलाईन भरलेला फोर्म मिळत असतो तो फोर्म घेऊन व त्याला आपले सर्व कागदपत्र जोडून आपल्या जिल्ह्यातील समाज-कल्याण ऑफिस मध्ये जमा करावे.

जमा केल्याच्या २ किंवा ३ महिन्या नंतर आपल्या ई-मेल आयडी वर आपली व्ह्यालीडिटी येते.

एवढी प्रक्रिया कास्ट व्ह्यालीडीटी प्रमाणपत्र काढाय साठी लागते.


जर तुम्हाला स्वतः Caste Validity साठी अप्लाय करायचं आहे तर या वेबसाईट वर जा 

https://bartievalidity.maharashtra.gov.in/

मित्रांनो कधी पोस्ट आपल्याला आवडली असेल तर नक्की आपल्या मित्राण पर्यंत पोहोचवा.

अशेच नव-नवीन पोस्ट वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम च्या  ग्रुप मध्ये सामील व्हा.



अशेच नव-नवीन पोस्ट वाचण्यासाठी आमच्या WhatsApp च्या  ग्रुप मध्ये सामील व्हा.



जय हिंद जय महाराष्ट्र 



Post a Comment

0 Comments