डोमेशियल प्रमाणपत्र (Domecile Certificate)कसे काढावे ? व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात पूर्ण माहिती.

How to get Domicile Certificate? And what documents are required for that, complete information?


मित्रांनो आजच्या पोस्टात आपण पाहणार आहो डोमेशियल प्रमाणपत्र काय आहे व ते कश्या प्रकारे बनविल्या जाते आणि त्या साठी कोण-कोणत्या कागद पत्राची आवश्यकता असते.

 

मित्रांनो डोमेशियल प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवास प्रमाणपत्र होय.याची आवश्यकता आपल्यास शाळेत किंवा कोणत्याही शासकीय नोकरीचा फोर्म भरतांना पडत असते.मित्रांनो तसेच याला वय राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र देखील म्हणतात.या दाखल्याचा उपयोग आपल्यास वयाचा पुरावा म्हणून सुद्धा होतो.या प्रमाण पत्राचे खूप वेग-वेगळे फायदे आपल्याला पाहायला मिळत असतात.


👉या प्रमाणपत्राला बनविण्याचे फायदे काय ? How To Domecial & Age Nationlity Certificate Benifits?

१) या प्रमाणपत्राचा अर्थ महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी म्हणून सुद्धा केल्या जातो.
२) या प्रमाणपत्राचा जास्तीत जास्त उपयोग शालेय कामा करिता होतो.
३) या पत्राला वय राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र सुद्धा म्हटल्या जाते.
४) या प्रमाणपत्राचा उपयोग वयाचा दाखला म्हणून सुद्धा करण्यात येतो.कारण कि या दाखल्यावर आपली संपूर्ण जन्म तारीख,जन्म ठिकाण लिहून येत असते.
५) या प्रमाणपत्राचा उपयोग आपण कोणतेही शासकीय फोर्म भरण्या साठी करू शकतो.कारण कि कोणतीही जागा निघाली कि त्यात या प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
६) या प्रमाणपत्राला इंग्लिश मध्ये Age Nationality & Domecile Certificate अशे म्हणतात.

👉 या प्रमाणपत्राला बनविण्यासाठी कोण-कोणत्या कागद पत्राची आवश्यकता आहे ?How To Requried Document For Domecial & Age Nationlity Certificate?

१) शाळा सोडल्याचा दाखला (T.C) 

२) जन्माचा दाखला     (Birth Certificate)

३) आधार कार्ड

४) राशन कार्ड 

५) रहिवाशी दाखला 

या प्रकारचे कागद-पत्र डोमेशियल प्रमाणपत्र बनवायसाठी लागतात.

👉हे पण जाणून घेणे आवश्यक ?

डोमेशियल प्रमाणपत्र हे कोण-कोणत्या अधिकाऱ्या जवळून पडताळणी करून तयार होते Domicile certificate is prepared after close verification by some authority-

१) नायब तहसीलदार - सर्वात पहिले तर आपण ज्या वेळेस डोमेशियल प्रमाणपत्र तयार करतो तेव्हा आपल्याला सेतूत जाऊन ऑनलाईन करा लागते. नंतर ते ऑनलाईन झाल्या नंतर नायब तहसीलदार साहेब यांच्या सही साठी जाते नंतर त्याची पडताळणी करून त्यावर सह्या केल्या जातात.

मित्रांनो गवरमेंट कडून अधिकार्यांना त्यांचे डेस्क निवडून दिल्या जातात जेणे करून ते अधिकारी लोक त्या आयडी वर काम करून आपल्याला प्रमाणपत्र देतात.

👉 टिप :- मित्रांनो आज काल कोणतीहि गोष्ट ऑनलाईन किंवा डिजिटल झालेली आहे.पहिल्या सारखे ऑफलाईन राहिलेली नाही.आणि ऑनलाईन झाल्या मुळे आपल्याला हि खूप चांगली सुविधा मिळत आहे.
ऑनलाईनच्या माध्यमातून आपण खूप काही करू शकतो.

-------------------------------------------------------------------

कधी तुम्हाला माहिती चांगली लागली असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा.