चारित्र्य प्रमाणपत्र (Charecter Certificate / Police Verification Certificate) कसे काढावे?व त्यासाठी कोण-कोणते कागदपत्र लागतात व त्याची प्रक्रिया काय आहे संपूर्ण माहिती. 


मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहो आपल्याला काही शासकीय कामासाठी चारित्र्य प्रमाणपत्र याची आवश्यकता पडते आणि अश्या वेळेस आपण काय करावे असा प्रश्न पडते तर आपण आज या पोस्ट मध्ये हेच पाहणार आहो.

* चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे काय ? What Is Charecter Certificate?
 - चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र होय.या प्रमाणपत्राची आपल्याला कोणत्याही शासकीय कामा करिता लागत असते.जसे कि कोणत्याही सरकारी विभागात आपल्याला फोर्म भरायचे असल्यास मंगतात.आणि काही सरकारी विभागात काही कंत्राटी विभागातहि मांगीतल्या जाते.
चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे आपल्या जीवनात आपल्यावर काही गुन्हे दाखल आहे का आपल्यावर काही कार्यवाही केलेली आहे का याची पूर्ण प्रक्रिया म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र होय.

चारित्र्य प्रमाणपत्र याला इंग्रजी मध्ये Police Clearnce Certificate म्हणतात.तसेच Charecter Certificate सुद्धा म्हणतात.आपण ज्या वेळेस भारत्या मारत असतो तेव्हा हि चारित्र्य प्रमाणपत्र आपल्याला मांगतात.

मित्रांनो चारित्र्य प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया हि ऑनलाईन आहे आणि याला आपण सुद्धा बनवू शकतो.पण आपल्याला जर बनवता येत नसेल तर आपण आपल्या जवळील ग्राहक सेवा केंद्र किंवा सेतू सेवा केंद्र याला सुद्धा भेट देऊन चारित्र्य प्रमाणपत्र बनवू शकतो.

👉चारित्र्य प्रमाणपत्र साठी लागणारे कागदपत्र ?

१) स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला 

२) आधार कार्ड 

३) १-पासपोर्ट फोटो 

४) घरातील लाईट बिल 

५) ज्या कामासाठी किंवा कंपनीसाठी आपण चारित्र्य प्रमाणपत्र घेत आहो त्याचा लेटर.


चारित्र्य प्रमाणपत्र बनवायसाठी या लिंकवर क्लिक करावे 


मित्रहो तुम्हाला या वेबसाईट वर गेल्या नंतर त्या साईटचे मुख्यपृष्ठ दिसेल तुम्हाला यावर आपले खाते तयार करायचे आहे खाते तयार झाल्या नंतर तुम्हला चारित्र्य प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
अर्ज भरल्या नंतर तुम्हाला वरील कागदपत्र जोडून व ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून आपल्या जवळील पोलीस स्टेशन मध्ये द्यावे लागेल.
नंतर त्या पोलीस स्टेशन मध्ये त्यावर प्रक्रिया झाल्या नंतर ते प्रकरण पुढील अधिकारी समोर तुमच्या जिल्ह्याच्या S.P Office मध्ये पाठवणार.आणि काही दिवसा नंतर एकतर तुम्हाला ऑनलाईन चारित्र्य प्रमाणपत्र येणार नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी जावे लागेल.

या प्रमाणे मित्रांनो तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र  बनवू शकता.  पोस्ट कधी आवडली असेल तर पोस्ट नक्की आपल्या मित्रांना पाठवा.


  चारित्र्य प्रमाणपत्र बनविण्याकरिता अर्जाचा नमुना / लेटर.